अनुसूचित
जातीच्या विद्यार्थ्यांनी
शिष्यवृत्तीसाठी
आधार संलग्नीकरण करुन घ्यावे
नांदेड, (जिमाका) दि.20 :- अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अद्यापपर्यंत आपले आधार नंबर एनपीसीआय मॅपरशी लिंक केले नाहीत त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून आपले आधार क्रमांक एनपीसीआयशी लिंक करुन घ्यावे व महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन करुन आपआपली प्रोप्राईल अद्यावत करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 2018-19 व 2019-20 या शैक्षणिक वर्षात भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापपर्यंत जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक मोबाईल नंबरवर याबाबतचा मेसेज समाज कल्याण कार्यालयामार्फत पाठविण्यात आला आहे. महाविद्यालयामार्फत सुध्दा विद्यार्थ्यांना तसे कळविण्यात आलेले आहे.
0000
No comments:
Post a Comment