Wednesday, January 20, 2021

 

विकेल ते पिकेल धोरणातर्गंत  

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळाव्याचे आयोजन

 नांदेड, (जिमाका) दि.20 :- विकेल ते पिकेल या धोरणांतर्गंत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळावा कृषि विभागामार्फत 26 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत आयोजित केला आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे फळे व भाजीपाला, विविध सेंद्रीय उत्पादने, गहु, ज्वारी, तांदुळ इ. धान्य, तुर, मुग, उडीद,  इत्यादी डाळी,  हळद, मिरची पावडर इत्यादी मसाले, लाकडी घाण्याचे तेल, सेंद्रीय गुळ, पाक, मध, विविध प्रकारचे पापड, लोणचे, चटण्या, शेतमालावर प्रक्रिया केलेले विविध पदार्थ इत्यादी शेतकऱ्यामार्फत ग्राहकांना थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...