सातव्या आर्थिक गणनेचे कामकाज करणाऱ्या
शासनाच्या प्रतिनिधींना नागरिकांनी सहकार्य करावे
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 23 :- केंद्र शासनातर्फे सातव्या आर्थिक गणनेचे कामकाज युद्धपातळीवर सुरु असून ग्रामीण भागासह आता शहर, महानगरामध्ये माहिती घेण्याचे काम सुरु आहे. या माहितीमध्ये व्यक्तीगत पातळीवरील आर्थिक माहितीचाही समावेश आहे. ही माहिती शासनस्तरावर गोपनीय राहणार असून सदर माहिती घरोघरी जाऊन घेणाऱ्या प्रगणक व तपासणी पर्यवेक्षकांना नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी समितीचे सदस्य तथा शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शासनाचे ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी या आर्थिक गणनेचा प्राधान्याने विचार केला जातो.
या राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेत व्यवसाय, उद्योग, उत्पादन, वस्तु व सेवा वितरणामध्ये सहभागी आस्थापना, रोजगार, कामगारांची संख्या, स्वयंरोजगार, कामगार पणन संस्था आदी घटकांची गणना केली जाणार आहे. यात सर्व प्रकारच्या आस्थापना (हंगामी, बारमाही, तात्पुरती) यांची माहिती गोळा केली जाणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षक हे आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम Common Service Centre (CSC) E-Governance यांचेकडून नेमण्यात आलेले आहेत. आर्थिक गणने अंतर्गत माहिती संकलनाचे काम प्रत्येक घरोघरी तसेच व्यापारी प्रतिष्ठाने यांना प्रत्यक्ष भेट देवून यांची माहिती पेपरलेस पध्दतीने मोबाइल आज्ञावलीव्दारे संकलित करण्यात येत आहे.
आस्थापनेची संपुर्ण माहिती प्रत्येक स्तरावर
गोपनीय राहणार आहे. यागणनेमध्ये कृषी,
वृक्षारोपण, बेकायदेशीर आर्थिक घडामोडी,
सार्वजनिक प्रशासन व संरक्षण आणि बाह्य-प्रादेशिक संस्थांच्या
आर्थिक घडामोडी इ. याबाबी वगळण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील गणनेचे काम अंतिम
टप्पात असून नागरी भागामध्ये कामास सुरूवात झालेली आहे. आर्थिक गणनेच्या माहितीचा
उपयोग केंद्र व राज्य शासनास नियोजन व धोरण आखण्यासाठी होतो. याप्रसंगी
जिल्हायातील सर्वशहर व गावांत गणनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हास्तरीय
समन्वय समिती मधील सर्व प्रशासकीय अधिका-यांनी गणना करण्यासाठी नेमणूक केलेल्या
प्रगणक व पर्यवेक्षक यांना यथोचित सहकार्य करण्याबाबतचे निर्देशही जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. प्रगणकांनी केलेल्या कामाचे तपासणी पर्यवेक्षक
करतील. सदरील गणनेचे निरीक्षण जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड
या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी या गणनेबाबत सहकार्य करण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आवाहन केले आहे.
0000
No comments:
Post a Comment