Friday, November 20, 2020

 

आरोग्य क्षेत्रातील रोजगार व कौशल्य विकासावर

ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे शुक्रवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) 20 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास योजना या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन शुक्रवार 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 4 ते सायं 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

भारत जोडो युवा ॲकडमीचे  तज्ज्ञ संस्थापक डॉ. बेलखोडे हे आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे. https://meet.google.com/tft-farj-qxd या लिंक वर क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट अ‍ॅप यापूर्वी इनस्टॉल केला नसेल तर इनस्टॉल करुन घ्यावा. आपण गुगल मीट अ‍ॅप मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रात सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु करून विचारावे व लगेच  माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड 02462-251674 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...