एप्रिल ते
जून 2020 कालावधीत मुदत संपणाऱ्या
ग्रामपंचायतींचा निवडणूक व मतदार यादीचा कार्यक्रम रद्द
नांदेड (जिमाका) 20 :- एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राबविण्यात आलेला मतदार यादीचा कार्यक्रम व निवडणुक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींचा मतदार यादी व निवडणुक कार्यक्रम नव्याने जाहिर करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये 31 मार्च 2020 रोजी होणारे जिल्ह्यात एप्रिल ते जुन 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या एकुण 100 ग्रामपंचायतीची 17 मार्च 2020 रोजी कोरोना महामारीमुळे आहे त्या टप्यावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगीत करण्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदार यादी व चालु निवडणुक प्रक्रिया रद्द केली आहे.
एप्रिल ते जुन 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती
पुढीलप्रमाणे आहेत. नांदेड तालुक्यात एकुण 24 ग्रामपंचायतीमध्ये ब्राम्हणवाडा, कामठा खु.,
बोंढार तर्फे हवेली, आलेगाव, दर्यापुर, पिंपरी महिपाल, कोटतिर्थ,
वाडी पुयड, वडगांव, इंजेगाव,
फत्तेपुर, कांकाडीतर्फे तुप्पा, किकी, धनगरवाडी, खुपसरवाडी,
विष्णुपुरी, भनगी, कल्लाळ,
पिंपळगाव निमजी, गुंडेगाव, नांदुसा/भालकी, वडवणा/खडकी, तळणी,
चिखली बु या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अर्धापूर तालुक्यातील
(2) गणपुर व सांगवी-खडकी. भोकर
तालुक्यात निरंक. मुदखेड तालुक्यात (2) पिंपळकौठा चोर, पांढरवाडी. हदगाव तालुक्यात (2) पिंगळी. हिमायतनगर तालुक्यात (5) चिंर्चोडी, सवना
ज., एकघरी, वाघी, महादापुर. किनवट तालुक्यात (10) आंदबोरी इ., बोधडी
खु., दहेगाव ची., गोंडेमहागाव, करंजी हुडी, कुपटी बु., लिंगी,
मलकवाडी, मदनापुरची., मलकापुर
खेर्डा. माहुर तालुक्यात (1) सिंदखेड. धर्माबाद, उमरी तालुक्यात निरंक.
बिलोली तालुक्यात (10) खतगांव, रामतिर्थ,
हुनगुंदा, किनाळा, पोखर्णी,
तोरणा, चिंचाळा, रामपुर
थडी, हिप्पलरगा माळ, केसराळी. नायगांव
खै. तालुक्यात (6) होटाळा, टाकळी त.ब., नावंदी, रातोळी, शेळगाव छत्री,
मांडणी. देगलुर तालुक्यात (1) तुपशेळगाव, मुखेड तालुक्यात
(24) शिरुर दबडे, कोटग्याळ, आडलुर/नंदगाव, सांगवी भादेव, गोणेगाव,
चव्हाणवाडी, आखरगा, हिप्पारगा
दे., उंद्री प.दे., सांगवी बेनक,
चिवळी, बेरळी बु., बेरळी
खु., धनज/जामखेड, डोरनाळी, राजुरातांडा, मेथी खपराळ, तग्याळ,
मंडलापुर, वर्ताळा, येवती,
राजुरा बु., मारजवाडी, इटग्याळ
प.दे., कंधार तालुक्यात (4) बाचोटी, बोरी खु., मरशिवणी, संगुचीवाडी.
लोहा तालुक्यात (10) जोशी सांगवी, कामळज, जोमेगाव, बोरगाव आ.,
हळदव, चितळी, धानोरा म.,
कलंबर खु., मुरंबी, गौंडगाव
याप्रमाणे जिल्ह्यात एप्रिल ते जुन 2020 या कालवधीत एकुण शंभर ग्रामपंचायतीची मुदत
संपली आहे.
00000
No comments:
Post a Comment