एप्रिल महिन्यात
शिधापत्रिकाधारकांना
23 हजार 450 मेट्रीक टन
धान्याचे वितरण
नांदेड, (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्हयात 1 हजार 993
रास्तभाव दुकानदार असून या सर्व रास्तभाव दुकानदारांना सर्व योजनेचे एप्रिल महिन्यांसाठी 24 हजार 206 मेट्रीक टन धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत
लाभार्थ्यांना वितरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्ह्यात 23 हजार 450.89 मेट्रीक टन धान्याचे वितरण 30 एप्रिल अखेर
करण्यात आले आहे.
30 एप्रिल 2020 अखेर पर्यंत, माहे एप्रिल 2020 या महिन्याचे नियमित अन्नधान्य वितरण नांदेड जिल्हयासाठी 1 हजार 993
रास्तभाव दुकानदारांकडून अंत्योदय योजनेचे 2 हजार 759.90
मे. टन, प्राधान्य कुटुंब योजनेचे 8 हजार 624.67 मे. टन व
केशरी
(शेतकरी) योजनेचे 1 हजार 953.22
मे. टन असे एकुण 13 हजार 337.78 मेट्रीक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे. सर्व योजनेचे एकुण
शिधापत्रिका 5 लाख 86 हजार 376
पैकी
5 लाख 67 हजार 938
(96.85
टक्के) शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरीत करण्यात आले आहे.
तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत एकुण शिधापत्रिका 4 लाख 90 हजार 499 पैकी
4 लाख 53 हजार 579
(92.47
टक्के) शिधापत्रिकाधारकांना 10 हजार 113.11 मे. टन धान्य वितरीत करण्यात आले आहे.
नोव्हेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या
पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व
एपील (केशरी) योजनेत समाविष्ट न झालेल्या एपील (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे 2020 साठी एकुण 83 हजार 638 शिधापत्रिका
धारकांनापैकी 1 हजार 579
शिधापत्रिका
धारकांना 21.41 मे.टन गहू व 14.28 मे. टन तांदूळ धान्य वितरीत करण्यात आले आहे. प्रतिकिलो
8 रुपये दराने गहू व प्रति किलो रुपये 12
दराने तांदूळ या सवलतींच्या दराने प्रतिमाह प्रती व्यक्ती 3 किलो गहू व 2
किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे.
ई-पॉसद्वारे धान्य वितरणाचा नियमितपणे आढावा घेऊन
कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात
येत आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांनी दिली आहे.
000000
No comments:
Post a Comment