प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा सुधारीत आदेश
निर्गमीत ;
वृत्तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करण्यास परवानगी,
मास्क व सॅनिटायजरचा वापर आवश्यकच;
ई-कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात
येणारी वाहने
आवश्यक परवानगीसह चालू ठेवता येतील
नांदेड दि. 21 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
करण्याबाबत नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम 144 ची मुदत 20 एप्रिल ते 3 मे 2020
पर्यंतचा सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज
निर्गमीत केले आहे.
महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन मदत व
पुनर्वसन विभागाकडील अधिसुचनेनुसार राज्य शासनाचे आदेश 21 एप्रिल 2020 अन्वये प्राप्त निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे आदेश दिनांक 19
एप्रिल 2020 मधील जमावबंदी आदेशामध्ये नमुद
बाबींमध्ये पुढीलप्रमाणे सुधारीत आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी
निर्गमीत केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचा आदेश 19 एप्रिल 2020 मधील मुळ मुद्दा क्र. 11 (i) मधील “प्रसारमाध्यमासह
इलेक्ट्रॉनिक मिडिया ज्यामध्ये डीटीएच आणि केबल सेवेचा समावेश असले. (तथापि
वृत्तपत्र,
दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करता येणार
नाही)” ऐवजी “प्रसारमाध्यमासह
इलेक्ट्रॉनिक मिडिया ज्यामध्ये डीटीएच आणि केबल सेवेचा समावेश असले (वृत्तपत्राची
घरपोच सेवा मागणीदाराला पूर्वकल्पना देवून सुरु करता येईल. तथापी घरपोच वृत्तपत्र, दैनिक, मासिके वितरण करणाऱ्या व्यक्तिने चेहऱ्यावर मास्क वापरणे, हाताला वारंवार सॅनेटायझरचा वापर करणे आणि सामाजिक सुरक्षेच्या मानकाची
पूर्तता करणे या अटीवर वृत्तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.)”
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचा आदेश दिनांक 19 एप्रिल 2020 मधील मुळ मुद्दा क्र. 11 (V) मधील “ई-कॉमर्स
कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने आवश्यक त्या परवानगीसह चालू ठेवता
येतील. ज्यामध्ये अन्न,
औषधे, वैद्यकिय उपकरणे आणि विद्युत आणि
इलेक्ट्रॉनिक उपकरणे या सारख्या सर्व प्रकारचे वस्तु आणि मालाचा पुरवठा” ऐवजी “ई-कॉमर्स
कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने आवश्यक त्या परवानगीसह चालू ठेवता
येतील. ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अन्न, औषधी आणि
वैद्यकिय उपकरणे” असा बदल करण्यात येतो.
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचा आदेश दिनांक 19 एप्रिल 2020 मधील मुळ मुद्दा क्र. 11 (XIII) मधील “कन्फेशनरी, फरसाणा, मिठाई दुकान (उक्त ठिकाणी खाण्याची बैठक व्यवस्था नसावी) ही परवानगी
(वगळण्यात) रद्द करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 13, 15 व 19 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड
संहिता 1973 चे कलम 144 नुसार मनाई
आदेश दि. 3 मे 2020 रोजी मध्यरात्री
पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश,
नियमावली आणि उपाययोजनासह लागू करण्यात आले आहे. तसेच 20 एप्रिल 2020 रोजीच्या शुद्धीपत्रकान्वये शासकीय,
निमशासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा
देणारी आस्थापना व त्यांच्याशी निगडीत दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने (केवळ अशा आस्थापना, दुकाने ज्यांना 13,
15 व 19 एप्रिल 2020 रोजीच्या
आदेशानुसार चालू ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे) हे केवळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहतील असे याद्वारे
आदेशित केले आहे.
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या
कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक
कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र
असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
तसेच यापूर्वी
जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाने निर्गमित केलेले दि. 13, 15, 19 एप्रिल 2020 वर नमूद आदेश व दिनांक 20 एप्रिल 2020 वर नमूद शुद्धीपत्रकाद्वारे दिलेले
वेळेचे बंधन इत्यादीसह अंमलात राहील, असे सुधारीत आदेश
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 21 एप्रिल 2020
रोजी निर्गमित केले आहे.
00000
No comments:
Post a Comment