Sunday, April 12, 2020


प्रधानमंत्री गरीब कल्‍या अन्‍न योजनेतील
 मोफत तांदळाचे जिल्ह्यात वितरण सुरु
          नांदेड दि. 12 :- प्रधानमंत्री गरीब कल्‍या अन्‍न योजनेतील मोफत तांदळाचे जिल्ह्यात वितरण सुरु करण्यात आले असून सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड व जिल्‍हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्‍यातील विशिष्‍ट आपत्‍कालीन परिस्थिती विचारात घेता, लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील लाभार्थ्‍यांना तीन महिन्‍यांचा शिधा एकत्रितरित्‍या उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. या सुचनांमध्‍ये बदल करुन आता शासनाने असा निर्णय घेतला आहे.
एप्रील, मे व जून 2020 साठी अन्‍नधान्‍याच्‍या दिलेल्‍या नियमित नियतनानुसार अंत्‍योदयकार्ड धारकांना 23 किलो गहू व 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्‍य, प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना प्रति व्‍यक्‍ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ आणि ए.पी.एल. शेतकरी यांना प्रति व्‍यक्‍ती गहू 3 किलो व तांदुळ 2 किलो (सर्व योजनांसाठी गहू 2 रुपये व तांदुळ 3 रुपये किलो) याप्रमाणे वाटप त्‍या-त्‍या महिन्‍यात करण्यात येणार आहे.
एप्रील, मे व जून 2020 या तीन महिन्‍याचे वरीलप्रमाणे नियमित अन्‍नधान्‍याचे वाटप झाल्‍यानंतर त्‍या-त्‍या महिन्‍यात प्रधानमंत्री गरीब कल्‍याण  अन्‍न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील पात्र लाभार्थ्‍यांना ज्‍यामध्‍ये प्राधान्‍य कुटुंब योजनेतील लाभार्थ्‍यांना प्रति सदस्‍य प्रतिमाह 5 किलो तांदुळ (मोफत) त्‍याचबरोबर अंत्‍योदय योजनेतील लाभार्थ्‍यांना शिधापत्रिकेतील सदस्‍य संख्‍येनुसार प्रति सदस्‍य 5 किलो प्रमाणे प्रतिमाह तांदळाचे (मोफत) वाटप करण्‍यात येणार आहे. या दोन्‍ही प्रकारचे वाटप PoS मशीन मार्फत होणार आहे. सध्‍या नांदेड जिल्‍हयातील नायगाव, हदगाव, बिलोली, नांदेड, मुदखेड, कंधार तालुक्‍यात मोफत तांदळाचे वितरण सुरु झाले असुन उर्वरित तालुक्‍यात चालु आठवड्यामध्‍ये मोफत तादुळाचे वितरण सुरु होणार आहे. मोफत तांदुळ एपीएल शेतकरी लाभार्थी यांना मिळणार नाही.
       याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्‍हयातील सर्व स्‍वस्‍तधान्‍य दुकानदार यांना वरीलप्रमाणे जिल्‍हयातील पात्र लाभार्थ्‍यांना धान्‍य वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत.        नांदेड जिल्‍हयात एकूण 1 हजार 993 रास्‍त भाव दुकानदार असन या सर्व रास्‍त भाव दुकानदार यांना सर्व योजनेचे एप्रिलसाठी 24 हजार 206 मेट्रीक टन धान्‍य सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतर्गत लाभार्थ्‍यांना वितरणासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे.
        दिनांक 12 एप्रिल 2020 पर्यंत माहे एप्रिल 2020 चे नियमीत अन्‍न धान्‍य वितरण नांदेड जिल्‍हयातील 1993 रास्‍त भाव दुकानदाराकड  अंत्‍योदय योजनेचे 2025.85, प्रा. कू. योजनेचे 5828.00 आणि केशरी (शेतकरी) योजनेचे 1294.62 असे एकुण  9 हजार 148.62 मेट्रीक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थीयांना वितरण करण्‍यात आले आहे.
      अन्‍न व नागरी पुरवठा ग्राहक सरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचा शासन निर्णय दिनांक 9 एप्रिल 2020 मध्‍ये शासनाने असेही निर्देश दिले आहेत की, नोव्‍हेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील. अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडींग झाले नसेल अशा शिधापत्रिकाधारकांना, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ज्‍यांचे वार्षीक कटुंबीक उत्‍पन्‍न 1 लाखाच्‍या आत आहे. अशा लाभार्थ्‍यांसाठी मे व जून 2020 या 2 महिन्यांच्‍या कालावधीसाठी प्रतिमा प्रतिव्‍यक्‍ती 3 किलो गहु  (8 रुपये प्रतिकिलो प्रमाणे), व तांदुळ 2 किलो (12 रु प्रतिकिलो प्रमाणे)  दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी नांदेड व जिल्‍हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...