विशेष लेख :
नांदेड आरोग्य यंत्रणा करतेय मिशन मोडवर काम...
नांदेड शहर म्हटले की डोळ्यासमोर येते शीख बांधवांचे
धार्मिक स्थळ तख्त
सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये मत्था
टेकण्यासाठी
अनेक नागरिक पंजाब आणि हरियाणा मधून येत असतात. देशात
23 मार्च नंतर लॉकडाऊन झाल्याने नांदेडमध्ये आलेल्या
नागरिकांची सोय केली. यामध्ये तीन हजार सातशे पंचावन्न (3755) नागरिकांची सोय गुरुद्वारा बोर्ड आणि
जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.
या दरम्यान सर्व संगत मधील यात्रेकरुंचे जवळपास 3 हजार 755 जणांची आरोग्य तपासणी नांदेड
महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने केली. प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी तीन दिवस सलग चार टीम
काम करीत
होत्या. यासाठी ताप तपासणीसाठी थर्मलगनचा वापर करण्यात आला होता. यात्रेकरुंची
आरोग्य तपासणी
करून तसेच महानगरपालिकेच्या क्षेत्रात (8355)आठ हजार तीनशे पंचावन्न नागरिकांना शहरी
भागात घरीच विलगिकरण करण्यात आले आहे. त्यांची
दैनंदिन भेट
देवून आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत
आहे. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी विषयी घरोघरी जाऊन विचारपूस केली जात
आहे. नांदेड शहरात अनेक परदेशी नागरिकांना देखील विलगिकरण करण्यात
आले असून यामध्ये 130 नागरिकांचा समावेश
आहे. या सर्वांची आरोग्य
तपासणी केली
असून याबरोबरच
नांदेड महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांनी कोरोणाच्या संसर्गाविषयी
प्रतिबंधात्मक उपाययोजनाची जाणीव जागृती करण्याचे काम नांदेड आरोग्य
यंत्रणा करीत आहे,
अशी माहिती महापालिकेचे
आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग हा जगासमोरील आताची सर्वात मोठी आपत्ती आहे
पण देश आणि राज्य पातळीवर प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणा सतर्कतेने
काम करताना दिसते आहे. नांदेड जिल्ह्याने आरोग्यविषयक काळजी आणि त्याप्रमाणे
उपाययोजना केल्यामुळे आतापर्यंत नियंत्रण मिळवले आहे. संपूर्ण
प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयाने आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन
यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य यंत्रणेने काम केल्याने सर्व परीचरिका, आशा कार्यकर्त्या, डॉक्टर यांचे
योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
- मीरा ढास ,
प्र. जिल्हा माहिती अधिकारी नांदेड
No comments:
Post a Comment