जात पडताळणीचे प्रस्ताव दाखल करण्याचे
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना
आवाहन
नांदेड, दि. 19 :- अनुसूचित जमातीच्या व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह 31 डिसेंबर
2019 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन औरंगाबाद येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहसंचालक तथा उपाध्यक्ष
यांनी केले आहे.
या समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत
नांदेड, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागातील व्यवसायिक
अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वेळेवर तपासणी
होऊन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण व्हावी. यासाठी शैक्षणिक वर्ष
2019-2020 या वर्षामध्ये शैक्षणिक संस्थामध्ये इयत्ता अकरावी व बारावीमध्ये
शिक्षण घेत असलेल्या व पुढील वर्षामध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात
पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत या समिती कार्यालयास 31 डिसेंबर 2019 पर्यंत सादर करावेत अन्यथा तदनंतरचे प्रस्ताव
स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक वर्ष
2020-21 पासून पुढील प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता अकरावी व बारावी
वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व पुढील वर्षामध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह
संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत या समिती कार्यालयास प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करणे आवश्यक असेल त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
विहित कालमर्यादेत जमातीचे प्रमाणपत्र तपासणीचा प्रस्ताव सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत
याची नोंद घ्यावी. त्यामुळे विद्यार्थी व कनिष्ठ
महाविद्यालये यांनी विहीत मुदतीत प्रस्ताव सादर करावेत असेही सहआयुक्त अनुसूचित जमाती
प्रमाणपत्र तपासणी समितीने कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment