सर्व पक्षीय धरणे आंदोलनामुळे आज
नांदेड शहरातील वाहतुक मार्गात
बदल
नांदेड, दि. 19 :- मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 अन्वये जिल्हादंडाधिकारी
अरुण डोंगरे यांनी अधिकाराचा वापर करुन शुक्रवार 20 डिसेंबर 2019 रोजी सीएए / एनआरसी विरोधात सर्व पक्षीय धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था
अबाधीत राखवी यादृष्टीने नांदेड शहरातील वाहतूकीच्या मार्गात बदल करुन पर्यायी
मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना प्रसिध्द केली आहे.
ही अधिसुचना 20 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 2
वा.पासून ते आंदोलन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी तात्पूरत्या स्वरुपात अंमलात राहिल.
त्यानंतर सदर अधिसुचना रद्द समजण्यात यावी, असेही आधिसुचनेत नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड शहरात 20 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर CAA/NRC विरोधात
सर्व पक्षीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांकरिता वाहनाच्या
वाहतूकीच्या व्यवस्थेत 20 डिसेंबर 2019 रोजी मध्यरात्री पासून आंदोलन संपेपर्यंत तात्पूरत्या स्वरुपात पुढील
पर्यायी मार्गावरील वाहतूकीस वळन देऊन बदल करणे आवश्यक असल्याचे कळवून अधिसूचना
प्रसिध्द होण्याबाबत विनंती केली होती.
वाहतूकीसाठी बंद असलेले मार्ग- वजिराबाद चौकाकडून पुढे शिवाजी महाराज
पुतळ्याकडे,
रेल्वे स्टेशनकडे व पुढे
चिखलवाडी कॉर्नरकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील. रेल्वे स्टेशनकडून व न्यायालयाचे
पाठीमागून शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील. महावीर
चौकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील. सोनू
कॉर्नरकडून महात्मा गांधी पुतळ्याकडे येणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग- ज्या वाहनधारकांना
वजिराबाद चौकाकडून रेल्वे स्टेशन पुढे चिखलवाडी कॉर्नरकडे जाण्याचे असल्यास
त्यांनी डॉक्टर लाईन मार्गे बिकानेर स्विट मार्ट जवळून रेल्वे स्टेशन मार्गे
हिंगोली गेट ते पुढे पर्यायी मार्गाने जावे. दुपारी 2 वा. ते धरणे आंदोलन
संपेपर्यंत वजिराबाद चौक ते महावीर चौक पुढे जुना मोंढा पर्यंत एकतर्फी असलेला
वाहतूक मार्ग दुतर्फी वाहतूकीसाठी चालु राहील.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 33 नुसार जिल्हादंडाधिकारी यांना त्यांच्या क्षेत्रात लोकांच्या सोयीकरीता
रहदारीचे विनियमन करण्याचा अधिकार प्रदान आहेत. त्यानुसार मुंबई पोलीस अधिनियम 1951
चे कलम 33 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण
डोंगरे यांनी अधिकाराचा वापर करुन नांदेड पोलीस अधीक्षक यांनी विनंती केल्यानूसार
शुक्रवार 20 डिसेंबर 2019 रोजी सीएए / एनआरसी विरोधात सर्व
पक्षीय धरणे आंदोलनाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखवी या दृष्टीने
वरिलप्रमाणे वाहतूकीच्या मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्यायबाबत
अधिसूचना प्रसिध्द केली आहे. ही अधिसुचना 20 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 2 वा.पासून
ते आंदोलन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी तात्पूरत्या स्वरुपात अंमलात राहिल त्यानंतर
सदर अधिसुचना रद्द समजण्यात यावी, असेही आधिसुचनेत नमूद केले आहे.
000000
No comments:
Post a Comment