Monday, November 18, 2019


मतदार यादीचा विशेष संक्षिप्त
पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित
         नांदेड दि. 18 :- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार 30 डिसेंबर 2019 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून 4 व 5 जानेवारी  2020 रोजी तसेच दिनांक 11 व 12 जानेवारी 2020 विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी दिनांक 2 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
       मतदार यादीमध्ये नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणी करावयासाठी मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करता येतील. मतदार यादीमध्ये ज्या मतदाराची नावे समाविष्ट नाहीत अशा मतदारांना नमुना 6 मध्ये अर्ज सादर करुन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करता येतील. अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना-6 अ मध्ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नोंदीबाबत अक्षेप असल्यास ही नोंद वगळण्यासाठी नमुना-7 मध्ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्या नोंदीबाबत दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना-8 मध्ये आणि एका भागातून दुसऱ्या यादीभागात नोंद स्थलांतरीत करावयाची असल्यास विहित नमुना 8-अ मध्ये अर्ज सादर करता येतील.
       अर्ज मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयात त्याचप्रमाणे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा बिएलओ यांच्याकडे मतदान केंद्रावर सादर करता येतील.
       दि. 1 जानेवारी 2020 रोजी ज्या भारतीय नागरिकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारिख दि. 1 जानेवारी 2002 रोजी किंवा त्यापूर्वीची आहे व जो त्या यादी भागातील सर्वसाधारण रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील. मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी, यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...