Monday, November 18, 2019


अकार्यरत संस्थांची नोंदणी
रद्द करण्याची मोहिम सुरु
        नांदेड दि. 18 :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नांदेड विभाग नांदेड यांच्यावतीने मंगळवार 19 नोव्हेंबर 2019 रोजी पासून अकार्यरत संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे.  
    या मोहिमेत ज्या संस्थांनी कार्यकारी मंडळाची बदल अर्ज अथवा लेखापरिक्षण अहवाल कार्यालयात सादर केलेला नाही अशा संस्थाची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. संबंधीत सर्व विश्वस्तांनी संस्थेत झालेल्या कार्यकारी मंडळात झालेले बदल व वार्षिक लेखापरिक्षण अहवाल सादर करावा. ज्या अकार्यरत संस्थाची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्या संस्थांची यादी charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे, असे आवाहन नांदेड सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे धर्मादाय उपआयुक्त किशोर मसने यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...