Monday, November 18, 2019


राज्यस्तर शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे  
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज उद्घाटन   
नांदेड दि. 18 :- क्रीडा युवक सेवा संचालनालय अंतर्गत नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय नेटबॉल (14 वर्षे मुले मुली) क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते मंगळवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वा. खालसा हायस्कुल नांदेड येथे होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, श्री हुजुर साहिब सचखंड गुरुद्वारा बोर्डचे अधीक्षक गुरुविंदरसिंग वाधवा, क्रीडा युवक सेवा उपसंचालक राजकुमार माहादावाड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक विठ्ठलसिंह परिहार, भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक उमेश ढाके, सहाय्य व्यवस्थापक निलेश चौधरी, गुरुद्वारा बोर्डचे अधिक्षक नारायणसिंग नंबरदार, रणजितसिंग चिरागिया, अमॅच्युअर नेटबॉल असोसिएशन महासचिव डॉ. ललित जिवानी, अमॅच्युअर नेटबॉल असोसिएशनचे सहसचिव श्याम देशमुख, प्राचार्य गुरुबचनसिंग शिलेदार, खालसा हायस्कुलचे मुख्याध्यापक चाँदसिंग, जिल्हा नेटबॉल असोसिएशन  सचिव प्रवीणकुमार कुपटीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
            या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील 8 विभागातून 300 ते 350 मुले-मुली खेळाडू, संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक, पंच, निवड समिती सदस्य, स्वयंसेवक आदी उपस्थित राहणार  आहेत. या स्पर्धांचे आयोजन बाद पध्दतीने होणार आहेत. या स्पर्धेतून निवडलेला महाराष्ट्र राज्याचा मुला-मुलींचा संघ नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन महाराष्ट्राचा प्रतिनिधीत्व करेल.
            ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, क्रिडा उपसंचालक राजकुमार माहादावाड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी विलास चव्हाण, क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधु, किशोर पाठक, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण, प्रवीण कुपटीकर (सचिव नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन), रवी बकवाड, संघटना प्रतिनिधी, आनंद जोंधळे (क्रीडा शिक्षक, शासकीय आश्रम शाळा,उमरी बा), हनमंत नरवाडे सुमेध नरवाडे आदी परिश्रम घेत आहेत.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...