Monday, November 25, 2019


शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी
उपाययोजनेंतर्गत प्रयास उपक्रम
चर्चासत्राचे गुरुवारी आयोजन
नांदेड दि. 25 :- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपायोजनेंतर्गत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून प्रयास या नावाने नांदेड जिल्ह्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. वैफल्यग्रस्त अवस्थेतुन वेळीच बाहेर कसे काढता येईल यावर विचार विनिमय व पुढील कार्याचे नियोजन करण्यासाठी गुरुवार 28 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 1 वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी आत्महत्या ही समाजासाठी कलंक असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनेंतर्गत त्याचाच एक भाग म्हणून गाव पातळीवर वैफल्यग्रस्त शेतकरी कुटुंबांचा शोध घेणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, मानसिक व आरोग्य विषयक अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत त्यांच्या योजनांद्वारे व सामाजिक संस्थांच्या मदतीने कशा प्रकारे मदत करता येईल यासाठी विविध किर्तनकार, भजनीमंडळ, ध्यानधारणा व योगसाधना यांच्या माध्यमातून त्यांचे उद्धोबधन करता येईल, जेणेकरुन त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना वैफल्यग्रस्त अवस्थेतुन वेळीच बाहेर कसे काढता येईल यावर विचार विनिमय करण्यासाठी व पुढील कार्याचे नियोजन करण्यासाठी गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 1 वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, या चर्चासत्रास संबंधितांनी, माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...