Monday, November 25, 2019


पिंपळढव साठवण तलावाच्या
बुडीत क्षेत्रातील जमिनीवर कामे करु नये
विष्णुपुरी प्रकल्प विभागाचे आवाहन
नांदेड दि. 25 :- भोकर तालुक्यातील पिंपळढव साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या सद्य:स्थितीत व नमूद दर्शविलेल्या गटनंबर मधील बुडीतक्षेत्रात येणाऱ्या जमिनीवर कसल्याही प्रकारची बांधकामे, फळझाडांची लागवड, बोअर घेणे, विहिर घेणे, पाईपलाईन आदी कामे करु नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 नांदेड यांनी केले आहे.
तलाठी सज्जा पिंपळढव, डौर, जामदरी, सिध्दार्थनगरवाडी यांच्याकडून पिंपळढव साठवण तलावाच्या बुडीतक्षेत्रात येणाऱ्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्याच्या प्रती संकलित केल्या आहेत. त्यावर इतर बाबीत दर्शविलेले विहिर, घर, फळझाडे, पाईपलाईन, बोअर आदी बाबींचे विवरण सात-बारा उताऱ्यानुसार प्राप्त झाले आहे. या सात-बारा उताऱ्यावर उपलब्ध असलेली माहिती गृहित धरुन भुसंपादन कार्यवाहीच्या वेळेस त्याचे मुल्यांकन अदा करण्यात येईल. सद्य:स्थितीमध्ये पिंपळढव साठवण तलावाच्या बुडीतक्षेत्रात येणाऱ्या जमिनीवर बऱ्याच प्रमाणात फळझाडांची लागवड, बोअर घेणे, विहिर घेण्याचे प्रकार चालु असल्याचे निदर्शनास आले आहे. या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची कामे करु नये, असेही आवाहन कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 नांदेड यांनी केले आहे.
000000



No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...