Saturday, November 30, 2019


रस्ता सुरक्षा प्रबोधनात्मक
महा-वॉकेथॉन रॅली संपन्न
नांदेड, दि. 30 :- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्यामार्फत "रस्ता सुरक्षा महा वॉकेथॉन" रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
ही रॅली ही माता गुजरीजी विसावा उद्यान येथून सुरु होऊन कुसूम सभागृह आयटीआय कॉर्नर ते शिवाजीनगर पोलीस ठाणे-जलतरण तलाव आणि परत विसावा उद्यान या मार्गावर घेण्यात आली. या रॅली शासकीय औद्योगिक संस्था, यशवंत महाविद्यालय, केंब्रीज विद्यालय, एनसीसी कॅडेट असे जवळपास पाचशे विद्यार्थी तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, ड्रायव्हींग स्कूल, वाहन वितरक प्रतिनिधी, वाहन मालक-चालक यांचे प्रतिनिधी जवळपास सातशे जणांनी या रॅली सहभाग घेतला.
या रॅली विद्यार्थ्यांनी विविध रस्ता सुरक्षात्मक स्लोगनच्या घोषणा देऊन पादचाऱ्यांचे तसेच तर नागरिक, चालक यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात टाळण्यासाठी लोकांमध्ये संदेश पसरविण्यास मदत झाली.
यासाठी महानगरपालिकेने विसावा उद्यान रॅलीसाठी उपलब्ध करुन दिले. या रॅली जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या सोबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहीत काटकर अनंता जोशी आणि कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कार्यालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या रॅलीमध्ये स्कुल बस असोसिएशन नांदेडचे अध्यक्ष निखिल लातूरकर, शासकीय औद्योगिक संस्थेचे डी. पुंडगे, मोहन कलंबरकर, पी. बानाटे तसेच केंब्रीज विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका आणि इतर महाविद्यालयाचे शिक्षक यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या आरंभी शासकीय रुग्णालय नांदेड येथील चमूने अपघात दरम्यान व्यक्तींना कसे हाताळावे याचे जीवंत प्रात्यक्षिक डॉ. शिंदे आणि श्री. सचिन यांनी उपस्थितांना दिले त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या रॅली दरम्यान शहर वाहतूक शाखा नांदेड यांनी वाहतूकीचे योग्य नियोजन करुन रॅली योग्यरित्या संपन्न झाली.
000000

x

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...