विजाभज, इमाव,
विमाप्र प्रवर्गातील
शिष्यवृत्तीधारक
विद्यार्थ्यांना आवाहन
नांदेड, दि. 30 :- शैक्षणिक
वर्षे 2015-16 ते 2017-18 या कालावधीतील
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी व संबंधित
महाविद्यालयांनी नमुद केल्याप्रमाणे बँक
खात्याच्या चुकीच्या विवरणामुळे अद्याप
शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्यास
त्यांनी 31 डिसेंबर 2019 पर्यंत सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क करुन अचूक
वैयक्तिक बँक खात्याच्या पासबुकाची
छायांकित प्रत अर्जासोबत सादर
करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत सरकार
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क
परीक्षा शुल्क प्रतिपुती (फ्रीशिप) व व्यावसायिक
पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता
(विद्यावेतन) योजनेंतर्गत
कनिष्ठ / वरिष्ठ अनुदानित व विनाअनुदानित
तसेच व्यावसायिक व बिगर
व्यावसायिक अभ्यासक्रमास शैक्षणिक
वर्षे 2015-16, 2016-17 व 2017-18 मध्ये प्रवेशित
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या
विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना लाभ
देण्यासाठी महाईस्कॉल प्रणाली कार्यान्वित
होती. या महाईस्कॉल प्रणाली अंतर्गत www.mahaeschol.maharashtra.gov.in संकेतस्थळावरुन उपरोक्त
योजनेेंतर्गत ऑनलाईन
अर्ज भरल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना निर्वा हभत्याची रक्कम
थेट बँक खात्यात
व शैक्षणिक शुल्काची रक्कम संबंधित
महाविद्यालयाच्या थेट बँक खात्यात
ईसीएसद्वारे जमा करण्यात येत
होती.
शैक्षणिक वर्षे 2015-16 ते 2017-18 मधील विजाभज, इमाव व विमाप्र
प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन
अर्जामध्ये चुकीचे बँक खाते
क्रमांक, चुकीचे आयएफएससी कोड भरलेले
असल्यास अशा विद्यार्थ्यांची निर्वाहभत्याची रक्कम अद्याप या कार्यालयाच्या
बँक खात्यावर अखर्चित (शिल्लक) आहे. तसेच ज्या महाविद्यालयाचे महाईस्कॉल
प्रणालीमध्ये वरील कालावधीतील चुकीचे
बँक खाते क्रमांक, चुकीचे आयएफएससी
कोड नोंदविलेले असल्यास अशा
महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम
अद्याप अखर्चित (शिल्लक) आहे.
या योजनेअंतर्गत
एक वर्षापेक्षा जास्त
कालावधी पासून वाटपासाठी शिल्लक
निधी अखर्चित (शिल्लक) राहिल्यास
हा अखर्चित निधी शासनखाती
जमा करण्याबाबत वरिष्ठांकडून सुचना
देण्यात आलेल्या आहेत. जे विद्यार्थी व महाविद्यालये
31 डिसेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत
अर्ज व अचूक वैयक्तिक
बँक पासबुकाची छायांकित प्रत
सादर करणार नाहीत असे
विद्यार्थी व महाविद्यालयाच्यावरील कालावधीतील
प्रलंबित अखर्चित (शिल्लक) शिष्यवृत्तीची
रक्कम कायमस्वरुपी शासनखाती
भरणा करण्यात येणार आहे.
त्याकरीता शैक्षणिक
वर्षे 2015-16 ते 2017-18 या कालावधीतील
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील
विद्यार्थी चुकीच्या बँक खाते
विवरणामुळे शिष्यवृत्तीच्या लाभापासून
वंचित राहिल्यास या कार्यालयाची
जबाबदारी राहणार ना ही संबंधितांनी याची
नोंद घ्यावी, असे
आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment