अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य
माणसाच्या जगण्याला बळ देणारे
-
शिवा
कांबळे
नांदेड, दि. 28 :- अण्णा भाऊ
साठे यांचे साहित्य माणसाच्या जगण्याला प्रेरणा देत असुन त्यांच्या
साहित्यातुन सामाजिक जाणिवा आणि माणसाच्या मोठेपणाचा उदघोष अण्णा
भाऊंनी आपल्या साहित्यातुन केला. अण्णा भाऊचे साहित्य हे माणसाच्या जगण्याला बळ देते,
असे प्रतिपादन अण्णा भाऊ साठे चरिञ
साधने प्रकाशन समितीचे सदस्य तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे
यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास
महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने अण्णा भाऊ साठे यांच्या
जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मातंग समाजातील विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे
वाटप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन
येथे मंगळवार 27 ऑगस्ट रोजी करण्यात
आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. व्ही.
आर. मेकाने हे होते तर
प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेड मनपाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे आाणि जात पडताळणी कार्यालयाचे उपायुक्त जे. एम.
शेख, उपअभियंता प्रकाश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते एन.जी.पोतरे, दलितमिञ पांडुरंग वाघमारे, जयप्रकाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री कांबळे म्हणाले, विद्यार्थ्यानी मोठी
स्वप्ने पहावित आाणि ती सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि
अभ्यास करावा तेंव्हा यश
संपादन करता येते. म्हणुन विद्यार्थ्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या
विचारांचा वसा आाणि वारसा
घेऊन जीवन घडवावे.
प्रयत्नांची पराकाष्ठा करुन यश संपादीत
करावे, असे आवाहन शिवा कांबळे यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. मेकाने यांनी शासनाच्या
वसतिगृहात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या वसतिगृहाचे
आणि आई-वडीलांचे नाव उज्ज्वल
तसेच जीवन सुखकर करण्यासाठी अभ्यासातून हे सिद्ध करुन
दाखवावे, असे मत व्यक्त
केले.
जात पडताळणी कार्यालयाचे उपायुक्त श्री शेख
यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले आयुष्यात यश संपादित करावयाचे असेल तर
विज्ञान व इंग्रजी
विषयाची भीती न बाळगता कष्टाने अभ्यास
करावा असा सल्ला दिला.
कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे म्हणाले खुप अभ्यास करुन आपल्या
आई-वडीलांची स्वप्ने साकार करावीत. कठीण परिश्रमातुन यशसंपादीत करता येते.
प्रस्ताविक महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जी.जी.येरपवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सुञसंचालन आणि आभार
बालाजी गवाले यांनी मानले. या कार्यक्रमात
शंभर विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे
वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी.आर.आंबटवार, डी.एम.कांबळे,गोविंद
सांगवीकर, रितेश मेडेवार, भास्कर
येलुरे पाटील, प्रविण घाळवट यांनी परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment