प्रादेशिक परिवहन
कार्यालय परिसरात
जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांचे हस्ते वृक्षारोपण
नांदेड, दि. 28
:- प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज वृक्षारोपण
करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी, अशोक काकडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जवळपास शंभर वृक्षांचे रोपन करण्यात आले.
33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय एमआयडीसी सिडको, मौ. वाघी
व तसेच सीमा तपासणी नाका देगलूर, बिलोली येथे जवळपास 680 वृक्षांची लागवड अधिकारी
व कर्मचारी यांच्या श्रमदानाद्वारे करण्यात आली. सर्वांनी वृक्षरोपण व संगोपनासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करुन पुढे
वृक्ष लागवडीचा कार्यक्रम चालू राहील, असे यावेळी सांगण्यात आले.
वृक्ष लागवडीच्या या कार्यक्रमात नांदेड जिल्हयातील वृक्ष संवर्धन
आणि संगोपन परिवारचे प्रतिनिधी उपस्थित होते. वृक्ष संवर्धन आणि संगोपन परिवाराच्यावतीने आयोजित केलेल्या उपक्रमाची माहिती यावेळी दिली
व एक व्यक्ती एक झाड या उक्तीप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री राऊत यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक पाच वृक्षांच्या संगोपणाची
जबाबदारी दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, अनंता जोशी, मोटार वाहन निरिक्षक मेघल अनासने, श्री.डोईफोडे, श्री.घाटोळ,
विनोद सुंदराणी सहा.मोटार वाहन निरिक्षक संजय पल्लेवाड, जमखंडीकर, श्री.पांडकर,
तसेच वृक्ष संवर्धन आणि संगोपन परिवारचे समन्वयक संतोष मुगटकर, वृक्षमित्र डॉ.परमेश्वर पौळ, संजय कदम, कैलाश अमिलकंठवार, गणेश साखरे, मुख्य लिपीक श्री. डवरे, श्री. केंद्रे, श्री. गोरे, वरिष्ठ लिपीक श्री.
गाजुलवाड, श्री. पवळे, श्री. कंधारकर, श्री. शिंदे, श्री.गाडचेलवार, श्रीमती वाघमारे, श्रीमती.जोशी
आदी कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment