Tuesday, July 30, 2019

जप्‍त रेती साठ्याचा आज लिलाव



नांदेड दि. 30 :- विनापरवानगी अनाधिकृत रेती साठा नांदेड तालुक्‍यात केल्‍याचे निदर्शनास आले असून हा रेती साठा जप्‍त करुन त्‍याची ईटीएस मोजणी करण्‍यात आली आहे. या रेती साठयाच्या लिलावाची पहिली व दुसरी फेरी नांदेड उपविभागीय अधिकारी यांच्‍या अधिपत्‍याखाली 31 जुलै 2019  रोजी सकाळी 11 वा. नांदेड तहसिल कार्यालय येथे घेण्‍यात येणार आहे.   
नांदेड तालुक्यातील हा रेती साठा पुढील ठिकाणी उपलब्ध असून पहिल्या फेरीतील रेती साठ्याचे ठिकाण व गाव (कंसात ईटीएस मोजणी अंती जप्त रेती साठा) मौ. नागापूर (966 ब्रास), मौ. वांगी (125 ब्रास), मौ. सिद्धनाथ (326 ब्रास), दुसरी फेरी मौ. भनगी (1261 ब्रास), मौ.  गंगाबेट (730 ब्रास), मौ. नाळेश्‍वर (191 ब्रास) एकूण (3599 ब्रास). या ठिकाणी रेती साठा गट नंबर निहाय असून स्‍थळाचे ठिकाण असलेला साठा तपासुनच बोलीत भाग घ्‍यावा. अटी शर्तीबाबत अधिक माहिती नांदेड तहसिल कार्यालयाचे गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहवयास मिळेल, असे तहसिलदार नांदेड यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

नांदेड लोकसभा, विधानसभा मतमोजणीला शांततेत सुरूवात #विधानसभानिवडणूक२०२४ #लोकसभापोटनिवडणूक #मतमोजणी #नांदेड #मतदान