Monday, July 29, 2019


विशेष तपासणी मोहिमेत
29 दोषी वाहनांवर कार्यवाही
नांदेड दि. 29 :-  जिल्ह्यात मोटार वाहन विभागामार्फत खाजगी प्रवासी बस वाहतूकी विरुद्ध विशेष तपासणी मोहिम 21 ते 27 जुलै कालावधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत 97 बसेसची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 29 दोषी वाहनांवर कार्यवाही करुन एक बस अटकाविण्यात आली आहे. तसेच टपावरुन पार्सल वाहतूक करणाऱ्या 5 बसेसवर कार्यवाही करण्यात आली.
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांच्या मदतीने वायुवेग पथकात कार्यरत मोटार वाहन निरीक्षक विनोद सुदंराणी, सहा. मोटार वाहन निरीक्षक संजय पल्लेवाड, किरण लोणे यांनीही मोहिम राबविली. ही तपासणी मोहिम अधीक प्रभावीपणे सुरु राहणार असून मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता बसधारकांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  26 जुलै #कारगिल #विजयदिवस शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र #अभिवादन...!