अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विभागाची कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 30 :- अल्पसंख्याक समाजाच्या
कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार सन
2019-20 साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक
शिष्यवृत्तीयोजनचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
सन 2019-2020 या
वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नांदेड
तालुका अंतर्गत दक्षिण व उत्तर भागातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या
मुख्याध्यापकांची दोन सत्रात तहसील सभागृह पंचायत समिती नांदेड येथे आज कार्यशाळा
संपन्न झाली.
या कार्यशाळेस
शिक्षणाधिकारी (मनपा) दिलीपकुमार बनसोडे, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिदास बस्वदे, बालाजी
शिंदे, शेख निझामम यांनी शैक्षणिक बाबीचा आढावा घेतला.
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती
अर्ज भरणे संदर्भात शेख रुस्तुमम जिल्हा समन्वयक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती
यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सांगितली. या कार्यशाळेस तालुक्यातील जवळपास
500 मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठक यशस्वितेसाठी मारोती ढगे, मिनल देशमुख यांनी
परिश्रम घेतले. सुत्रसंचालन संजय भालके यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment