Tuesday, July 16, 2019

बचत गटांसाठीच्या 'प्रज्ज्वला' चे नांदेडमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम



नांदेड, दि. ­­­16 :- राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रज्वलायोजना राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम 18 जुलै व 19 जुलै 2019 रोजी नांदेड शहर, लोहा, मुखेड, नायगाव येथे होणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील हे प्रशिक्षण होणार आहे.
"राज्यामध्ये सुमारे 3 लाख बचतगट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत. हे बचतगट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचतगटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्ज्वला योजना आकारास आली आहे. प्रज्वला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात एक जिल्हा, एक वस्तुअसे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत. त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.  तिसऱ्या टप्प्यात बचतगटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी बचत गट बाजारजिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे’,’ अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी दिली. 
या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. 
नांदेड जिल्ह्यातील प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून कार्यक्रमांचा तपशील पुढील प्रमाणे.
अ.क्र.
दिनांक
वेळ
स्थळ
उपस्थिती
१८.०७.२०१९
स.१०.०० ते दु.०१.३०
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड, स्टेडियम परिसर, नांदेड शहर.
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर
१८.०७.२०१९
दु.०२.३० ते सायं०५.३०
व्यंकटेश गार्डन, लोहा.
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर
१९.०७.२०१९
स.१०.०० ते दु.०१.३०
चौधरी फंक्शण हॉल, मुखेड
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर
१९.०७.२०१९
दु.०२.३० ते सायं०५.३०
अंबिका गार्डन, नायगाव
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर
****

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...