Monday, July 15, 2019

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत बुधवारी कार्यशाळा



नांदेड, दि. 15 :- जिल्हयातील सर्व शाळाच्या मुख्याध्यापकांची, स्कुलबस चालक-मालक, स्कुलबस संघटनेचे पदाधिकारी, परिवहन समितीतील इतर सदस्य यांची कार्यशाळा बुधवार 17 जुलै 2019 रोजी सकाळी 11  वा. DICTED प्रशिक्षण केंद्र (डी.एड.कॉलेज) श्रीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
यामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन (स्कुल बस करिता विनियमन) नियम 2011  मधील नियम, तरतूदी त्यामधील सुचना यांची, शालेय विदयार्थ्याच्या सुरक्षित वाहतुकीबाबत त्याअधिसुचना अन्वये तयार करण्यात आलेल्या समित्याची कामे, त्यांच्या जबाबदाच्या कर्तव्य याबाबत माहिती देण्यात येणार आहे. या कार्यशाळेस जिल्हयातील सर्व शाळाच्या मुख्याध्यापक, स्कुलबस चालक-मालक, स्कुलबस संघटनेचे पदाधिकारी, परिवहन समितीतील इतर सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...