Tuesday, July 16, 2019

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजना



नांदेड दि. 16 :- सुशिक्षीत बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजना / जिल्हा उद्योग केंद्राची कर्ज योजनेचे सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी उद्दीष्ट जिल्हा उद्योग केंद्रास प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सुशिक्षीत बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजनेसाठी पात्रता अर्जदार किमान 7 वी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे. उमेदवार बेरोजगार असावा.उमेदवाराचे महाराष्ट्रात पंधरा वर्षे वास्तव्य असावे.अर्जदाराने सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. योजनेत पात्र उद्योग / व्यवसायाच्या प्रकल्प खर्चाची कमाल मर्यादा 25 लाख रुपये राहील त्यात  एकूण स्थीर भांडवली गुंतवणूक खेळत्या भांडवलाचे सीमातिक भांडवल अंतर्भूत राहील. बीज भांडवल 15% प्रमाणे जास्तीत जास्त रु. 3 लाख 75 हजार रु. पर्यंत.   दहा लाख रुपयापेक्षा कमी प्रकल्प खर्च असलेल्या प्रकरणांमध्ये अनुसुचित जाती / जमाती / इतर मागासवर्गीय / अपंग / भटक्या / विमुक्तजाती जमातीसाठी बीज भांडवल प्रकल्पाचे  20 टक्के राहील. कर्जफेड, कर्ज दिल्यानंतर व्यापार सेवा उद्योगासाठी 6 महिन्यांचा विलंब अवधीनंतर 6 महिन्यापासून 4  वर्षापर्यंत लघुउद्योगसाठी 2 वर्षाच्या विलंब अवधीनंतर 3 ते 7 वर्षात 5 हप्त्यात परतफेड करावी. बीज भांडवल कर्जासाठी व्याजाचा दर द. सा. द. शे. 6 टक्के असून नियमीत परतफेड करणा-या   लाभार्थीस 3%  सवलत देण्यात येईल   थकबाकीदारास 1 टक्के दंड व्याज आकारण्यात येईल. बीज भांडवल कर्जाचा गैरवापार करणा-यास 2 टक्के दंड व्याज लावून एक रकमी वसुली करण्यात येईल. बीज भांडवल कर्ज मंजुरीनंतर जिल्हा उद्योग केंद्राचे नावे दुसरा अधिभार नोंदवणे आवश्यक आहे.
जिल्हा उद्योग केंद्राची कर्ज योजना - शिक्षणाची वयाची अट नाही. या योजनेत उद्योग सेवा उद्योग यासाठी  कर्ज मिळू शकते. योजनेत यंत्रसामुग्रीमधील एकूण गुंतवणूक रु. 2 लाखाच्या आत असावी. ही योजना 1981 नुसार 1 लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात / ग्रामीण भागात लागू आहे. योजनेखाली उद्योग सेवा तसेच अस्तित्वात असलेल्या लघुउद्योगाच्या वाढीसाठी अर्ज करता  येतो. अर्ज 75 टक्के कर्ज मिळण्यासाठी वित्तीय संस्थेकडे (राष्ट्रीय बँका, व्यापारी बँका व्यापारी  सहकारी बँका) पाठविण्यात येतो. एकूण प्रकल्प खर्चाच्या सर्वसाधारण घटकांना 20% प्रमाणे रु.40 हजारापर्यंत अनु.जाती/जमातीसाठी 30 टक्के प्रमाणे रु.60 हजार पर्यंत मार्जीन मनी 4% दराने मिळेल ते पाच वर्षात परतफेड करावयाचे आहे. या योजनेतर्गत राष्ट्रीयकृत बँका, सर्व ग्रामीण बँका यांच्यामार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. ही योजना शहरी ग्रामीण भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे, अशी माहिती महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी दिली आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...