Friday, July 5, 2019


भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2019-20 मध्ये राबविण्यासाठी
शासन निर्णयातील काही अटींमध्ये अंशत: बदल करण्यास शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
v  फळबाग लागवडीचा कालावधी माहे जून ते मार्च अखेरपर्यंत राहील.
v  शेतक-यांना आवश्यकतेनुसार 16 फळपिकांच्या कलमे/रोपांची लागवड करण्यास मान्यता आहे.
v  कोकण विभागाकरीता जास्तीत जास्त 10 हेक्टर तर उर्वरीत विभागाकरीता जास्तीत जास्त         6 हेक्टर या अनुज्ञेय क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेण्यासाठी 5 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील फळबाग लागवडीकरीता 100 टक्के अनुदान या योजनेतूनच देय राहिल.
v  सदर योजने अंतर्गत ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य असलेली अट शिथिल करुन कोकणातील ज्या शेतक-यांना डोंगर उताराचे क्षेत्र जास्त व विहिरींची संख्या कमी असल्यामुळे ठिंबक सिंचन संच बसविणे शक्य होत नाही. परंतु योजनेतील इतर घटकांचा लाभ घेवू इच्छितात अशा शेतक-यांना शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या झाडे जगवण्याच्या अटीवर अन्य घटकांचा लाभ घेता येईल.
v  लाभार्थीने प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत त्याच सर्व्हे नंबर/गट नंबर करीता लाभ घेतलेला असेल व ठिबक सिंचन संचाचे आयुर्मान किमान 4 वर्षांपर्यंत बाकी असेल व सदर संच नविन फळबागलागवडीच्या  अंतरासाठी योग्य असेल तर अशा ठिकाणी  ठिबक सिंचन ही बाब न राबविता योजनेतील इतर घटकांचा  लाभ देय राहील. 
v  कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकीत खाजगी रोपवाटीका यांबरोबरच कृषि विभागाच्या परवानाधारक रोपवाटीकेतून कलमे/रोपे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 
v  प्रशासकीय खर्चामध्ये अनुज्ञेय असलेल्या खर्च रक्कमेच्या मर्यादेत एका शासकीय रोपवाटीकेतून अन्य शासकीय रोपवाटीकेमध्ये  कलमे/ रोपांची वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...