नांदेड,
दि. 5 :- येथील प्रादेशिक परिवहन
कार्यालयासाठी सन
2019 मध्ये वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत
सिमा तपासणी नाका बिलोली 50, प्रादेशिक
परिवहन कार्यालय नांदेड येथे 50, मौजे
वाघी येथे 100 असे एकूण 200 वृक्ष
लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले
आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन
कार्यालय येथे 102 वृक्षांच्या लागवडीचे
प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश
राऊत यांचे हस्ते शुभारंभ करण्यात
आली.
यावेळी सहा.प्रादेशिक परिवहन
अधिकारी अनंत भोसले, मोटार वाहन
निरिक्षक सुंदराणी, श्री. शेख, सहा.मोटार
वाहन निरिक्षक श्री.पांडकर, मुख्य लिपीक
संजय केंद्रे, एकनाथ
डवरे, वरिष्ठ लिपीक राजेश गाजुलवाड, अनंत
पाराशर, रोहित कंधारकर, गजानन शिंदे, नरेश
देवदे, दिलीप गाडचेलवार, श्रीमती जयश्री
वाघमारे, श्रीमती संतोषी जाधव, कनिष्ठ लिपीक
नंदकिशोर कुंडगीर, मोतीराम पोकले, राजु
बंतलवाड, प्रदीप बिदरकर, रवि बुरुकूले, अंबरदास
राऊत, संजय कोंगलवार, श्रीमती राधा
जेलेवाड, श्रीमती रुपाली येंबरवार, श्रीमती आर.
टी. भलगे, तैय्यब खान, श्रीमती
मालन मरळककर, श्रीमती पल्लवी
सरोदे, रमेश पवळे हे उपस्थित होते.
याप्रसंगी कर्मचारी व अधिकारी
यांच्याद्वारे वृक्षाची लागवड करण्यात
आली व
वृक्षांची जोपासना करण्याचे ठरविण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment