Saturday, June 29, 2019

बचतगटांना मिनी ट्रॅक्टर योजनेतील अर्जाच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन



           नांदेड, दि. 29 :- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसाहय्यता बचत गटांनी केलेल्या अर्जात त्रुटींची पूर्तता संपूर्ण कागदपत्रांसह बुधवार 10 जुलै 2019 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे सादर करावीत, असे आवाहन नांदेड समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसाहय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित आहे. या लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.  
सन 2018-19 या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी केलेल्या अर्जांची तपासणीत अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे. अर्जातील त्रुटींची पूर्तता 10 जुलै 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत करुन घ्यावी. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरवून ईश्वर चिट्ठीने निवड प्रक्रियेत आपल्या बचत गटाचा सहभाग राहणार नाही. तसेच याबाबत आपला कुठलाही दावा मान्य करण्यात येणार नाही, असेही आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1161   राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, ...