Saturday, June 29, 2019

भारतीय डाक विभागाच्यावतीने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे आयोजन



नांदेड, दि. 29 :- भारतीय डाक विभागाच्यावतीने रविवार 1 जुलै 2019 रोजी डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा 4 था वर्धापन दिन नांदेड मुख्य डाकघर, खरबी तालुका लोहा, भोपळा- शंकरनगर उपडाक कार्यालय, होणवडज व वडगाव- मुखेड उपडाकघर, दत्त माजरी- माहूर उपडाकघर याठिकाणी साजरा करण्यात येणार आहे.  
डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा उपक्रम आहे. याद्वादे इंटरनेटचे जाळे देशाच्या सुगम तसेच दुर्गम ठिकाणी पोहचून भारतातील सर्व नागरिकांपर्यंत सरकारी सुविधा इंटरनेटद्वारे पोहोचवण्याचा भारत सरकारचा हेतू आहे. या उपक्रमाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोजी यांच्या हस्ते 1 जुलै 2015 रोजी झाली आहे. या उपक्रमाद्वारे भारतात दुर्गम ठिकाणी चांगल्या प्रतीचे वेगवान इंटरनेटद्वारे पोहोचवण्याच्या योजनांचा समावेश आहे. या अभियानामार्फत सरकारचा देशाला एक माहिती तंत्रज्ञानावर आधारित सशक्त अर्थसत्ता बनवण्याचा प्रयास आहे.
या कार्यक्रमाद्वारे भारतीय डाक विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे कामकाज पूर्णपणे डिजिटल स्वरुपात करण्यात येत आहे. Direct Beneeit Transfer द्वारे शासकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, रोजगार हमी योजनेचे वाटप तसेच सर्व प्रकारचे बँकिंग सुविधा याद्वारे देण्यात येत आहेत. तसेच टपाल जीवन विमा, सुकन्या समृद्धी योजना, बचत खाते आदी सुविधा टपाल खात्यामार्फत पूर्णपणे डिजिटल स्वरुपात देण्यात येत आहेत, असे अधीक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1161   राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, ...