Saturday, June 29, 2019


जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या
शासकीय वसितगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 29 :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्षे 2019-20 साठी जिल्ह्यातील विविध शासकीय वसतिगृहात रिक्त जागेसाठी इयत्ता आठवी, अकरावी, पदवी व पदविका प्रथम वर्षे या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरु आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना नियमानुसार मोफत निवास, भोजन व्यवस्था व इतर भत्ते मिळतील. जिल्ह्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहांचे गृहपाल यांनी केले आहे.
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह तहसिल कार्यालय जवळ नायगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रविंद्रनगर बिलोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सरकारी दवाखान्याजवळ अर्धापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गुजराती भवन धर्माबाद, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह किनवट रोड भोकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आनंदनगर नांदेड या वसतिगृहात रिक्त जागेसाठी प्रवेश प्रक्रिया पुढील वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
शासकीय वसतीगृहाचे सन 2019-20 साठी प्रवेशाचे वेळापत्रक
शालेय विद्यार्थ्यांसाठी :- ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालवधी 15 जून ते 4 जुलै 2019. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करणे 8 जुलै 2019. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 21 जुलै 2019 पर्यंत.  रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 22 जुलै 2019, दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 31 जुलै 2019 पर्यंत. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 5 ऑगस्ट 2019 पर्यंत राहिल.
इयत्ता दहावी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)  - ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालवधी 15 जून ते 14 जुलै 2019. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करणे 15 जुलै 2019 पर्यंत. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 31 जुलै 2019 पर्यंत.  रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 10 ऑगस्ट 2019. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 20 ऑगस्ट 2019 पर्यंत. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 21 ऑगस्ट 2019 पर्यंत राहिल.
बी.ए. / बी. कॉम / बी.एस.सी या 12 नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी आणि एम.ए. / एम.कॉम/एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) - ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालवधी 15 जून ते 24 ऑगस्ट 2019. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करणे 27 जुलै 2019 पर्यंत. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2019 पर्यंत.  रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 16 ऑगस्ट 2019. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 24 ऑगस्ट 2019 पर्यंत. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 30 ऑगस्ट 2019 पर्यंत राहिल.  
व्यावसायिक अभ्यासक्रम - ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालवधी 15 जुलै ते 28 ऑगस्ट 2019. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करणे 31 ऑगस्ट 2019 पर्यंत. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 5 सप्टेंबर 2019 पर्यंत.  रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 9 सप्टेंबर 2019. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 12 सप्टेंबर 2019 पर्यंत. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 18 सप्टेंबर 2019 पर्यंत राहिल.
पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास वरील दिलेल्या दिनांकापर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस प्राधान्य देऊन त्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांनी या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधीत शासकीय वसतिगृहांचे गृहपाल यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...