Friday, May 31, 2019


हवामान आधारीत फळपिक विमा योजना 
नांदेड दि. 31 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुर्नरचीत हवामानावर योजना सन 2019-20 मध्ये राबविण्याकरीता लागु करण्यासाठी शासनाने 22 मे 2019 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. नांदेड जिल्हयातील मृग बहारामधील मोसंबी या फळपिकाचा यामध्ये समावेश केलेला आहे.
ही योजना नांदेड जिल्हयातील अधिसुचीत केलेल्या महसुल मंडळात एस.बी.आय.जनरल इंशुरन्स विमा कंपनी लि. मार्फत राबविण्यात येत आहे. मोसंबी फळपिकाखालील नांदेड तालुक्यामध्ये लिंबगाव, विष्णूपुरी, मुदखेड तालुक्यात मुदखेड, बारड, मुखेड तालुक्यात मुखेड व जाहुर, धर्माबाद तालुक्यात करखेली, हदगांव तालुक्यात हदगाव व पिंपरखेड, कंधार तालुक्यात बारुळ या महसुल मंडळांचा समावेश आहे. पुर्नरचीत हवामान आधारीत पिक विमा योजना 2019-20 च्या मृग बहाराकरीता मोसंबी या पिकासाठी एकुण विमा संरक्षीत रक्कम (प्रति हे.) रु.77,000/- असुन शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता (प्रति हे) रु. 3,850/- एवढा आहे.
मृग बहारामधील मोसंबी फळपिकाचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत  दिनांक 1 जुलै 2019 अशी आहे. त्याकरीता इच्छुक मोसंबी उत्पादक शेतकरी बंधुंना आव्हान करण्यात येते की, विहित मुदतीत विमा हप्ता बँकेत भरावा. अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...