Friday, May 31, 2019


वादळी वीज पडतांना स्‍वत:चा बचाव कसा करावा .... 
       नांदेड दि. 31 :- दरवर्षी जगात विजा पडुन होणा-या मृत्‍युंचे प्रमाण हे खपुच जास्‍त आहे. नांदेड जिल्‍हयात वारंवार विजा पडुन मोठया प्रमाणावर वित्‍त आणि जीवितहानि झालेली आहे. निश्चितच ही बाब जिल्‍हा प्रशासनासाठी चिंतेचे कारण बनलेली असुन याबाबत सखोल संशोधन करण्‍यासाठी भारतीय उष्‍णदेशीय मौसम विज्ञान संस्‍थान, पृथ्‍वी विज्ञान,मंत्रालय भारत सरकार, पुणे येथील दोन वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञांनी नांदेड जिल्‍हयातील विज प्रवण गावांना भेटी दिल्‍या होत्‍या तसेच त्‍यांचा संशोधनाचा अहवाल जिल्‍हा प्रशासनास पाठविलेला होता.
वादळी व पावसाळी विजेपासुन स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी
वादळी वातावरणात खालील खबरदारी घ्‍यावी:
1.      उंच झाड किंवा लोखंडी कुंपन/खांबाजवळ थांबु नका.
2.      उंच झाड कोसळणा-या विजेला आकर्षित करतात.
3.      डोक्‍यावर असलेले विजेचे तार अथवा लोखंडी आच्‍छादनाखाली आश्रय घेऊ नका.
4.    विजेचा कडकडाट होतांना टेलिव्हिजन संच बंद करा. दार/खिडकीतुन बाहेर डोकावु नका.
5.     विजेचा कडकडाट होतांना जवळ पास आश्रय उपलब्‍ध नसल्‍यास खाली बसुन जा... कारण विज ही उंचीच्‍या ठिकाणी कोसळते.
6.      वाहनावर असाल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍या.
7.     विज कोसळण्‍यापुर्वी मोठा प्रकाश होतो व त्‍यानंतर पाच ते आठ सेकंदांनी विज कोसळते. आवाजापेक्षा प्रकाशाची गती जास्‍त असल्‍यामुळे हे घडते त्‍यामुळे अशा वेळी सावध रहा.
8.     शेतात खुल्‍या ठिकाणी लहान झोपडी बांधुन घ्‍यावी, ज्‍यामुळे आकाशात विजा चमकतात तेव्‍हा या ठिकाणी आसरा घेता येते. ही जागा उंच झाड अथवा मनो-याच्‍या ठिकाणापासुन दुर असावी, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर  यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...