प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत
2 लाख 74 हजार शेतकरी कुटूंबांची नोंदणी
बॅकेद्वारे 2 हजार रुपयाचा पहिला हप्ता सुरु
नांदेड, दि. 26 :- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते गोरखपूर उत्तर
प्रदेश येथून रविवार 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात या योजनेत
माहिती अपलोड केलेल्या 2 लाख 74 हजार 93 शेतकरी
कुटुंबाना 2 हजार रुपयाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येत आहे.
या योजनेचा शुभारंभ मान्यवर व शेतकऱ्यांच्या
उपस्थितीत विविध ठिकाणी एकाच दिवशी संपन्न झाला. नांदेड येथील जिल्हास्तरीय कार्यक्रमात मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद
साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या व शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मानही
केला.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत मंगळवार 26 फेब्रुवारी अखेर जिल्ह्यात परिशिष्ट अ प्रमाणे अनिवार्य
माहिती संकलीत गावे 1 हजार 568 तर परिपूर्ण पात्र शेतकरी कुटुंब 2 लाख 91 हजार 866
एवढी आहेत. एनआयसी पोर्टलवर 1 हजार 561 गावांची व 2 लाख 74 हजार 93 शेतकरी
कुटूंबाची माहिती अपालोड करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात अपलोड पात्र कुटुंबाची
टक्केवारी 93.91 एवढी आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना 3 हप्त्यात 6 हजार रूपये मिळणार आहेत.
ज्या
शेतकरी कुटुंबाची विविध ठिकाणी मिळून 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे
अशा कुटुंबाची स्वतंत्र यादी तयार केली आहे. पात्र खातेदाराचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक
खाते क्रमांक व आयएफएससी कोड, आधार क्रमांक ओळखपत्र, जन्म दिनांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक आदिची माहिती परिशिष्ट-अ मध्ये गावनिहाय
नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून संकलीत करुन ती संबंधित तहसील कार्यालयातून
पोर्टलवर अपलोड केली जात आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली
आहे.
00000
No comments:
Post a Comment