दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान
वैश्विक ओळखपत्र शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 25
:- दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत वैश्विक ओळखपत्र (दिव्यांगाचे
स्मार्ट कार्ड) नोंदणीसाठी तालुकास्तरावर 26 फेब्रुवारी ते 11 मार्च 2019 या
कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींनी सकाळी 11 ते दुपारी
4 वाजेपर्यंत या शिबरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.
के. मिनगीरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात ज्या व्यक्तीकडे
दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र एसएडीएम प्रणालीचे आहे अशा व्यक्तीने http://www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर किंवा नजीकच्या ई-सेवा केंद्रात तसेच
शिबरात आधारकार्ड, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, रंगीत पासपोर्ट छायाचित्र,
रेशनकार्ड घेऊन अपलोड करुन घ्यावेत. अपलोड केल्याची प्रिंट शिबिराच्या ठिकाणी जमा करावी.
मंगळवार
26 फेब्रुवारी अर्धापूर व नांदेड तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर व श्री
गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय नांदेड. गुरुवार 28 फेब्रुवारी 2019 रोजी बिलोली
व धर्माबाद तालुका- ग्रामीण रुग्णालय बिलोली व धर्माबाद. शुक्रवार 1 मार्च 2019
रोजी कंधार व लोहा तालुका- ग्रामीण रुग्णालय कंधार व लोहा. शनिवार 2 मार्च 2019
रोजी हदगाव व हिमायतनगर तालुका- उपजिल्हा रुग्णालय हदगाव व ग्रामीण रुग्णालय
हिमायतनगर. मंगळवार 5 मार्च 2019 रोजी नायगाव व उमरी तालुका- ग्रामीण रुग्णालय
नायगाव व उमरी. बुधवार 6 मार्च 2019 रोजी किनवट व माहूर तालुका- ग्रामीण रुग्णालय
किनवट व माहूर. गुरुवार 7 व शुक्रवार 8 मार्च 2019 रोजी देगलूर व मुखेड तालुका- उपजिल्हा
रुग्णालय देगलूर व मुखेड. सोमवार 11 मार्च 2019 रोजी भोकर व मुदखेड तालुका-
ग्रामीण रुग्णालय भोकर व मुदखेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment