Wednesday, January 30, 2019


लोकशाही पंधरवाडा निमित्त
जनजागृती रॅली उत्साहात संपन्न 
नांदेड दि. 30 :- लोकशाही पंधरवाडा निमित्त लोकशाही, निवडणूक व सुशासन ही संकल्‍पना जनमाणसात रुजवून मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग, मतदार यादीत नावाची खात्री, मतदानाची टक्‍केवारी वाढविणे,  विद्यापीठ व महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात सर्व विषयांसाठीलोकशाही, निवडणूक व सुशासन हा विषय अनिवार्य करणे आदीबाबत जनजागृती करण्यासाठी महात्मा फुले पुतळा आयटीआय नांदेड परिसरातून रॅली उत्साहात काढण्‍यात आली होती.
या रॅलीची सुरुवात जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या मार्गदर्शानाखाली अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. रॅलीत पिपल्‍स कॉलेज, यशवंत महाविद्यालय व सायन्‍स कॉलेज नांदेड या तीन कॉलेजचे एनएसएस व छात्रसेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीची महात्मा फुले पुतळा येथुन शिवाजीनगर, कलामंदिर, वजीराबाद मार्गे जिल्‍हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे रॅलीचा समारोप झाला.
यावेळी उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) अनुराधा ढालकरी यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाल्या,     स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूकीत केलेल्‍या सुधारणांची माहिती देणे हा पंधरवाडा साजरा करण्‍याचा उद्देश आहे. निवडणुकामध्‍ये आता अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात येत आहे. उमेदवाराला नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्र व उत्‍पन्नाचा गोषवारा देणे, उमेदवाराच्‍या गुन्‍हेगारी पार्श्‍वभुमीची माहिती मतदान केंद्राच्‍या बाहेर मतदारांच्‍या माहितीसाठी उपलब्‍ध करुन देणे अनिवार्य केले आहे. तसेच नोटाला सर्वाधिक मते पडल्‍यास अशा ठिकाणी फेर निवडणूक घेण्याबाबत आयोगाचे आदेश आहेत. तसेच सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य स्‍वंस्‍थेस या पंधरवाडात किमान 10 होर्डींग, बॅनर लावणेच्‍या सुचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
स्‍थानिक केबल व आकाशवाणीवर लोकशाही, निवडणुक व सुशासनाच्‍या जिंगल्‍स प्रसारित करण्‍यात येत आहेत तसेच चर्चासत्रे आयोजित करण्‍यात येत आहेत. महिला मतदारांची नावे नोंदणी वाढविणे तसेच ग्रामीण भागात निवडणुकीचे महत्‍व पटवुन देण्यासाठी चुनाव पाठशालाचे आयोजन करावे, असे निर्देश राज्‍य निवडणुक आयोगाचे आयुक्‍त यांनी दिले आहेत. त्‍यानुसार जिल्‍हास्‍तरावर उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य), मनपा स्‍तरावर उपायुक्‍त, जिल्‍हा परिषद स्‍तरावर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी (पंचायत), तालुका स्‍तरावर सर्व संबधीत तहसिलदार यांना नोंडल अधिकारी म्‍हणुन नियुक्‍त करण्‍यात आले आहे. त्‍यांना सहाय्यक गटविकास अधिकारी व मुख्‍याधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. विद्यापीठाचे नोंडल अधिकारी म्‍हणून प्रा. डॉ. ए.एन. सिध्‍देवाड यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. त्‍यांच्‍यामार्फत काही महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांना स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये नेऊन तेथील कामकाज व निवडणुक प्रक्रियेविषयी माहिती देण्‍यात येणार आहे. या पंधरवाड्यात जिल्‍हातील सर्व महाविद्यालयात निबंध स्‍पर्धा, वाद-विवाद स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धाचे आयोजन करण्‍याच्‍या सुचना सर्व तहसिलदार व कुलसचिव स्‍वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ यांना देण्‍यात आल्‍या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.   
प्रा. डॉ. सिध्‍देवाड यांनी राज्‍य निवडणुक आयोगाच्‍या सुचनेनुसार लोकशाहीचे मुल्‍ये कशी रुजवायची, लोकशाहीचे महत्‍व तसेच मतदानाचा अधिकाराचा उपयोग याबाबत तसेच राज्‍य निवडणूक आयोग याची माहिती दिली. शेवटी तहसिलदार अरविंद नरसिकर यांनी आभार मानले.  
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...