Wednesday, January 30, 2019


अंतिम मतदार यादी आज प्रसिध्‍द होणार
मतदारांनी नावाची खात्री करुन घ्यावी
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 30 :- येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्‍हयातील सर्व मतदारांनी या 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री करुन घ्‍यावी. यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ, तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी  अरुण डोंगरे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत नाव नोंदणी,दुरुस्‍ती,वगळणी संदर्भात दावे व हरकती ऑनलाईन व ऑफलाईन  मागविण्‍यात आले होते.  या कार्यक्रमात नमुना क्र. 6 चे 1 लाख 16 हजार 773 अर्ज प्राप्‍त झाले त्‍यापैकी 1 लाख 12 हजार 479 अर्ज मंजूर करण्‍यात आले आहेत. नमुना क्र 7 चे 16 हजार 697 प्राप्‍त अर्जांपैकी 16 हजार 33 अर्ज मंजूर करण्‍यात आली आहेत. या मतदार यादीत एकूण मतदार संख्‍या 25 लाख 3 हजार 602 इतकी आहे.  या मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री करुन घ्‍यावी, असेही आवाहन केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...