Wednesday, January 30, 2019


रस्ता सुरक्षा अभियानात
चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन
नांदेड दि. 30 :- रस्ता सुरक्षा अभियान 2019 च्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नांदेड जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली असून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक दिले जाणार आहे. जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी गट विषय पुढील प्रमाणे राहतील. चित्रकला स्पर्धा :  छोटा गट इयत्ता 1 ते 4 पर्यत- रहदारीचे नियम पाळा, अपघात टाळा. मध्यम गट इयत्ता 5 ते 8 पर्यत- सुरक्षित वाहतूक. वरिष्ठ गट इयत्ता 9 ते 12 पर्यत- आदर्श वाहतूक व्यवस्था.  निबंध स्पर्धा : मध्यम गट इयत्ता 5 ते 8 पर्यंत- रस्ते सुरक्षा हे घोषवाक्य नसून ती जीवनशैली आहे. मोठा गट इयत्ता 9 ते 12 पर्यत- अपघातमुक्त समाजासाठी आपले योगदान हा विषय राहिल. 
या स्पर्धेच्या अटी शर्ती पुढील प्रमाणे आहेत निबंध चित्रकला स्पर्धेतील इच्छूक स्पर्धेकांनी त्यांना दिलेल्या विषयावरील आपला निबंध चित्र संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांचेकडे जमा करावयाचे आहेत. संबंधीत शाळांनी आपल्या शाळेतून एका गटासाठी तीन सर्वोत्कृष्ट निबंधाची चित्रकला स्पर्धेसाठी 5 सर्वोत्कृष्ट चित्रांची निवड करुन निबंध चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालय, एमआयडीसी सिडको नांदेड येथे खिडकी क्र. 5 वर सोमवार 11 फेब्रुवारी 2019 पर्यत  कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करावेत.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी या कार्यालयातील दुरध्वनी क्र. (02462) 259900 वरिष्ठ लिपीक गाजुलवाड यांचा मोबाईल क्र.7875422228 वर संपर्क करावा. निबंध चित्रकला स्पर्धेमध्ये जास्तीत विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...