प्रजासत्ताकदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा
वापर न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 24 :- येत्या 26 जानेवारी
या प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करु नये, असे आवाहन
राज्यशासनातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वजाचा आदर करणे
हे देशाच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.दरवर्षी 26
जानेवारी,
15 ऑगस्ट, 1 मे, इतर
राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी
विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार
पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज
मैदानात,
रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले असतात. हे
राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या
यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले
आहेत. त्यांनी हे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत.
प्लास्टिक व कागदी
राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या कार्यरत आहेत. शासनाने प्लास्टिक मुक्त
महाराष्ट्र ही मोहीम सुरु केली आहे. प्लास्टिक बंदीचा कायदा लागू केला आहे.
प्लास्टिकची वस्तू वापरल्यास दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकचे ध्वज न वारण्याबाबत शाळा, महाविद्यालये,
विविध सामाजिक संस्था यांनी प्रबोधन करणे आवश्यक आहे. ध्वजाचा योग्य सन्मान राखणे
ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
00000
No comments:
Post a Comment