Friday, December 7, 2018


नांदेड येथे राज्यस्तरीय
शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन
नांदेड, दि. 7 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा बेसबॉल असोसिएशन नांदेड यांच्यावतीने राज्यस्तर शालेय बेसबॉल 14 वर्षे मुले-मुली क्रीडा स्पर्धेचे आयोजन 7 ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत पोलिस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास क्रीडाप्रेमी, खेळाडू मुले-मुलींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते 8 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वा. पोलिस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, क्रीडा उपसंचालक श्रीमती उर्मीला मोराळे, राज्य बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखनकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
रविवार 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वा. बक्षिस वितरण कार्यक्रम नांदेड जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा  आमदार डी. पी. सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हुजुर साहिब सचखंड गुरुद्वारा बोर्डचे अधीक्षक डी पी. सिंग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे क्रीडा संचालक विठ्ठलसिंह परिहार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रामलू पारे, एस. एम. पटेल, सुरज सोनकांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न  होणार आहे.
या स्पर्धेसाठी राज्यातील 8 विभागातून 256 खेळाडू मुले-मुली, 16 क्रीडा मार्गदर्शक, 16 संघ व्यवस्थापक व 20 स्वयंसेवक व निवड समिती सदस्य असे एकुण 315 उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन व नियोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधू, सय्यद साजीद, आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण, नांदेड जिल्हा बेसबॉल संघटनेचे प्रलोभ कुलकर्णी, त्यांचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...