Friday, December 7, 2018


नांदेड डाक विभागात
स्वच्छता पंधरवाडा संपन्न

नांदेड, दि. 7 :- स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी दूरसंचार विभागाच्यावतीने भारतीय डाक विभागात स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या दरम्यान स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
या पंधरवाड्यात दरदिवशी नवनवीन उपक्रम राबविण्यात आले. त्यात मुख्यत्वे करुन पोस्टमनची निवड स्वच्छता दूत म्हणून करुन त्यास स्वच्छतेचे महत्व सांगणारा टी-शर्ट वाटप करण्यात आला. त्याद्वारे त्यांच्या वाटप क्षेत्रात स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करण्याची अभिनव कल्पना राबविण्यात आली.
याशिवाय विविध कार्यालयात वृक्षारोपण, टपाल पेटीचे रंगकाम, होर्डिंग लावणे व स्वच्छता पत्रक वाटप करण्यात आली. डाक कार्यालयात येणाऱ्या व जाणाऱ्या टपालावर Discourage the use of plastic carry Bags  हा शिक्का मारण्यात आला. त्याद्वारेही प्लास्टीकचा वापर टाळावा हा संदेश जनतेत पोहचविण्यात आला. या स्वच्छता कार्यशाळेच्या अध्यक्षतेस्थानी केशव घोणसे पाटील होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शेवटी स्वच्छ कार्यालयास स्वच्छ व सुंदर कार्यालयाचे बक्षीसही जाहीर करण्यात आले. स्वच्छता पंधरवाड्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन करणे व तो यशस्वीरित्या राबविण्यासाठी डाक अधिक्षक लिंगायत तसेच उपडाक घर अधिक्षक नागरगोजे यांनी विशेष प्रयत्न केले व पुढेही असेच स्वच्छतेचे उपक्रम राबविण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले.  
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...