संविधान दिनानिमित्त रॅलीस
जिल्हाधिकारी यांचे हस्ते झेंडी
दाखवून शुभारंभ
नांदेड दि. 26 :- भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि नागरिकांना
संविधानाची ओळख व्हावी यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. या
दिनानिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत आयोजित संविधान रॅलीस
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी हिरवी झेंडी दाखवून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या
पुतळ्यापासून मार्गस्थ केले.
यावेळी महापौर शिलाताई
भवरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची
प्रमुख उपस्थिती होती. ही रॅली महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा ते शिवाजीनगर,
कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करुन रॅलीचा समारोप
करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांनी महात्मा
ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या रॅलीत विविध
विद्यालय, महाविद्यालय विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, एनसीसी, स्कॉऊट विद्यार्थी
सामाजिक कार्यकर्ते, समता दुत आदींचा सहभाग होता.
000000
No comments:
Post a Comment