गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत
धर्मगुरु,
सामाजिक संस्था, मदरसांनी
सहभागी व्हावे
नांदेड दि. 26 :- जागतिक आरोग्य
संघटनेच्या निष्कर्षानुसार भारतात मिझेल्स अर्थात गोवरामुळे बालमृत्यूदरात वाढ
होते. तसेच रूबेला संसर्गाने जन्मजात आजार होतात. बालमृत्यू दराचे वाढलेले
प्रमाण कमी करण्यासाठी व रूबेला संसर्गाने होणारी जन्मजात विकलांगता नियंत्रीत
करण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात सार्वजनिक आरोग्य
विभागामार्फत मिझेल्स-रूबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
ही मोहिम राज्यात दिनांक 27 नोव्हेंबर 2018
पासून सुरू होणार असून 4 आठवडे चालणार आहे. मिझेल्स व रूबेला लसीकरण मोहिमेचे
महत्व लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मदरसांमधील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना
प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे लसीकरण होणे आवश्यक आहे.
त्यामुळे या मोहिमेत 15 वर्षाखालील सर्व मदरसामध्ये राहून शिक्षण घेणा-या सर्व
विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे शक्य होईल याकरिता जिल्ह्यातील मुस्लीम धर्मगुरू, सामाजिक संस्था
आणि सर्व मदरसांना सदर मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
000000
No comments:
Post a Comment