Monday, November 12, 2018


असमान निधी योजनेसाठी
शासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव पाठवावेत
नांदेड, दि. 12 :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता यांच्या असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्जामध्ये नमुद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेतील पुरीपुर्ण प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास शुक्रवार 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत पोचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणा-या अर्जाचा नमुना सुधारीत स्वरुपात असावा. सन 2018-2019 पासून प्रतिष्ठानकडून असमान निधी योजना सुधारीत करण्यात आल्या आहेत. या असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यात प्रस्ताव राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून मागविण्यात येत आहेत. याबाबत इच्छूकांनी नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावे.
असमान निधी योजना सन 2018-2019 साठी यात  ग्रंथालय सेवा देणा-या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. "राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञानकोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य.   महोत्सवी वर्ष जसे 50 / 60 / 75 / 100 / 125 / 150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य.  राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षणवर्ग, जागरुकता कार्यक्रम आयोज‍ति करण्यासाठी अर्थसहाय्य.  बालग्रंथालय व राजाराम मोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.  दिव्यांग वाचकांसाठी आावश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठीचे अर्थसहाय्य.   हस्तंलिखीताचे कॉपी राईट, दुर्मिळग्रंथ व दस्तावेज, जुनीनियतकालिके, ऐतिहासिकरेकॉर्डस आणि सामग्री यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी अर्थसहाय्य.  डिजीटल माहिती सेवा विभाग प्रस्तापित करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय्य. "स्वच्छ भारत अभियान" अंतर्गंत सार्वजनिक ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य. राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानांच्या योजनांबाबत इच्छूकांनी संबंधीत जिल्हयाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानांचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...