Monday, November 12, 2018


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत
विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश  
नांदेड, दि. 12 :- येत्या 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन ते 19 नोव्हेंबर (जागतीक शौचालय दिन) या कालावधीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याच्या सुचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी निर्गमित केल्या आहेत. दिलेल्या सुचनेनुसार संबंधित विभागाने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत.
मा. पंतप्रधान यांनी 2 ऑक्टोंबर 2014 रोजी राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशन घोषित केले आहे. यात सार्वजनिक आस्थापनांच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता, घर व गावातील परिसर स्वच्छता, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची बांधणी, अंगणवाडी व शालेय स्वच्छता गृहाची बांधणी, तसेच उघड्यावरील शौचाची प्रथा बंद करणे याबाबी महत्वपूर्ण आहेत. निर्मल ग्राम, निर्मल तालुका घोषित करण्याच्या कार्यक्रमामध्ये याबाबी महत्वपूर्ण आहेत. या उपक्रमात निबंध स्पर्धा घेणे, भित्तीचित्र स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्वच्छ परिसर, स्पर्धाचे तसेच 14 नोव्हेंबर रोजी स्वच्छ शाळा व स्वच्छ अंगणवाडी दिवस. 15 नोव्हेंबर रोजी स्वच्छ परिसर (मैदाने इ.). 16 नोव्हेंबर रोजी वैयक्तिक स्वच्छता व बाल आरोग्य. 17 नोव्हेंबर रोजी स्वच्छ अन्न. 18 नोव्हेंबर रोजी स्वच्छ पिण्याचे पाणी. 19 नोव्हेंबर रोजी शौचालय आयोजन करण्यात यावे.  
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बाल स्वच्छता मिशन राबविण्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय भारत सरकार यांनी राज्यांना सुचित केले आहे. बालकांना स्वच्छतेचे संदेश, हात धुणे व प्रचार प्रसिद्ध करीता महत्वाचे दूत म्हणून या मोहिमेत सहभागी करुन घ्यावयाचे आहे. बालकांना या मोहिमेमध्ये सहभागी करुन घेण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्यास आपले गाव, तालुका व जिल्हा निर्मल होण्यामध्ये महत्वाची भुमिका बालके बजावू शकतात. बाल दिन 14 नोव्हेंबर ते जागतीक स्वच्छतागृह दिन 19 नोव्हेंबर पर्यंत ही मोहिम राबवायची आहे. त्यामध्ये बालकांना लघवी व शौचाला जाणेकरीता घर, शाळा, एसटी स्टँड, बस थांबे, यात्रास्थळे, उपहारगृह, प्रेक्षणीय स्थळे, आठवडी बाजार, मैदाने सार्वजनिक ठिकाणे स्वच्छता गृह उपलब्ध करुन देणे व वेळेवर स्वच्छता गृह उपलब्ध होणे या बालकांच्या हक्कांची त्यांना जाणीव करुन दयावयाची आहे. या उपक्रमाच्या कालावधीत विषयनिहाय जबाबदार अधिकारी निश्तिच करण्यात आले आहे, अशा सुचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत.  
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...