Monday, November 12, 2018


एकात्मिक बाल विकास सेवा योजना
आठवडा साजरा करण्याचा सुचना
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना आठवडा 14 ते 19 नोव्हेंबर  या कालावधीत साजरा करण्याच्या सुचना महिला व बालविकास विभागाने निर्गमीत केल्या आहेत. त्यानुसार संबंधित विभाग प्रमुखांनी कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
या कालावधीत जिल्ह्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करावे. या कार्यक्रमात मुलांसाठी कार्यक्रम, बालकांचे आपापसात स्वयंस्फुर्ततेने आदान-प्रदानाबाबत प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये समंजस्याची भावना आणि कुपोषणाचे परिणाम अंगणवाडीस्तरावर समजावून सांगणे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडी क्षेत्रात अहिंसा संदेशाचा प्रसार करणे व बालकांचा आणि महिलांचा समावेश करुन त्यांना या कार्यक्रमात केंद्रित करावे. तसेच अंगणवाडीमध्ये बालकांची आरोग्य तपासणी झालेली आहे, पूर्व शालेय शिक्षणाची प्रगती, अंगणवाडीचे बांधकाम झालेले आहे काय, गरम ताजा आहाराचा पुरवठा योग्य प्रकारे होत आहे, त्याचप्रमाणे बालकांचे अतितिव्र कुपोषित कमी वजनाची बालके शोधून कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, नागरिकांना पोष्टिक आहाराबाबत माहिती व नियमित जेवणात पौष्टिक आहाराचा समावेश करुन, पौष्टिक आहार घेण्याचे महत्व पटवून देणे व पौष्टिक आहार घेण्यास प्रोत्साहन देणे इत्यादीबाबत कार्यक्रम हाती घ्यावेत. या कार्यक्रमात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, अशा सूचना महिला व बालविकास विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...