Monday, November 12, 2018


प्रधानमंत्री पिक विमा योजना
रब्बी हंगामासाठी पिक विमा उतरविण्याचे आवाहन   
नांदेड, दि. 12 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 साठी कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2018 ही आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राबविण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. या विमा कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक असुन बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाच्छिक आहे.
या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत आहे. या योजनेअंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणीपासन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग त्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसानत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागु आहे.
या योजनेअंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
पीक
विमा संरक्षीत रक्कम / हेक्टर  
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये
विमा लागू असलेला तालुका
गहु (बा)
34 हजार 600 रुपये
519/-
नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलेाली, धर्माबाद, नायगाव, कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, भोकर.
ज्वारी (जि)
25 हजार 200 रुपये
378/-
नांदेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, मुख, देगलूर, किनवट, हदगाव.
हरभरा
23 हजार 100 रुपये
346.50/-  
नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, देगलूर, मुखेड, किनवट, नायगाव, मुदखेड, हिमायतनगर.
ही योजना फ्युचर जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, टॉवर-3,सेनापती बापट मार्ग, एलफिस्टन रोड, पश्चिम मुंबई -400013 या कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...