Monday, August 13, 2018


कापूस, सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश
 नांदेड दि. 13 :- जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
कापूस पिकावर प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 टक्के  ए एफ 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरील फवारावे.
सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी कामगंध सापळे लावा आणि निरीक्षण करा. तसेच प्रोफेनोफॉस 50 ईसी 25 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी, असेही आवाहन केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...