नोव्हेंबरमध्ये
जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण
मोहिम
पूर्वतयारीसाठी कार्यशाळा
गोवर-रुबेला
लसीकरण मोहिम यशस्वी करावी
---
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 13:- गोवर व
रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात नोंव्हेबर महिन्यात राबविण्यात येणार असून ही मोहिम
यशस्वीरित्या , सुक्ष्म नियोजन पूर्वक करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यांनी सांगितले.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिम
जिल्हास्तरीय प्रशिक्षण व नियोजन कार्यशाळेचे आयोजन हॉटेल ताज पाटील मध्ये करण्यात
आली होती.
या लसीकरण मोहिम
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यावेळी जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही.आर. मेकाने,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुंटूरकर, श्री. कट्टाणी , जिल्हा परिषदेचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण सिंगणे
एस. व्ही., शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डी.
एस.मठपती, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक देवकरे, एसएमओ डॉ. अमोल गायकवाड, डॉ.
विद्या झिने, वैद्यकीय अधीक्षक , तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम
अधिकारी सुभाष खाकरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे विवेक डावरे, नागेश देशमुख यांची
यावेळी उपस्थिती होती. कार्यशाळेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
दिपप्रज्वलनाने करण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री. अरुण
डोंगरे पुढे म्हणाले की, गोवर-रुबेला लस मोहिमेत 9 महिने ते 15 वर्ष या वयोगटातील
मुलांना देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेबाबत प्रत्येक गावात, शाळेच्या
विद्यार्थी , शाळाबाह्य बालकांपर्यंत ही लस पोहचविण्याची नियोजनबध्द राबविण्यात
येणार आहे. त्याची सुरवात देशातील विविध राज्यात यापूर्वी झाली आहे. यापूर्वी
देशातील नऊ कोटींच्यावर बालकांना यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक
घटकांनी या कार्यात सहभाग नोंदवून कार्य करावे. तसेच लसीकरणासाठी 9 महिने ते 15
वर्ष वयोगटाखालील पात्र लाभार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट झाले
पाहिजे, असेही जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे
पुढे म्हणाले की, रुबेला हा एक संक्रामक समान्यत: सौम्य व्हायरल संसर्ग असून तो
मुख्यत: मुले आणि तरुण पिढीमध्ये होतो. गर्भवती स्त्रियांमध्ये रुबेला या
आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मृत्यू किंवा जन्मजात दोष ( जसे की, अंधत्व,
बहिरेपणा आणि ह्दय विकृती) होऊ शकतो हे बालक जन्मजात रुबेला सिंड्रोम (सीआरएम)
म्हणून ओळखले जाते. गोवर आणि रुबेला या दोन आजारांपासून आपल्या बालकांना सुरक्षित
करु शकतो . जरी यापुर्वीदेखील आपण आपल्या बालकास गोवर रुबेलाचे लसीकरण केले असेल
तरी मोहिमेमध्ये लसीकरण करणे अनिवार्य आहे, असेही यावळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे
यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. अशोक काकडे पुढे म्हणाले की, कोणत्याही कार्यक्रमाची
सुरुवात ही नियोजनपूर्वक केले, तर आपण यश प्राप्त करु शकतो. आपली सामाजिक बांधिलकी
ठेवून सुक्ष्मनियोजन करुन लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी
श्री. काकडे यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक म्हणाले
की, गोवर-रुबेला या लसीकरणाबाबतची माहिती दिली.
अंगणवाडी, शालेय , शाळाबाह्य
व नियमित लसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करणे, त्यांची संख्या निश्चित करणे, सुक्ष्म
कृतीनियाजन तयार करणे, मोहिमेचे नियोजन, अहवाल पर्यवेक्षण, शितसाखळी व्यवस्थापन ,
लसीची मागणी, मोहिमेचे पर्यवेक्षण व मुल्यमापन करणे, मोहिमेच्या व्यापक
प्रसिध्दीबाबत नियोजन करणे इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच शंभर टक्के
बालकांना लसीकरण करण्यास्तव विविध शासकीय, अशासकीय विभागाचा समन्वय, जबाबदाऱ्या व
मार्गदर्शन करण्यात आले.
या गोवर-रुबेला लसीकरण मोहिम
जिल्हास्तरीय प्रशिक्षण व नियोजन कार्यशाळेचे सुत्रसंचालन डॉ. दुर्गादास रोडे
यांनी केले . प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही. आर. मेकाने
यांनी केले.
****
No comments:
Post a Comment