Monday, August 13, 2018


लोकसंख्या शिक्षण विषयक जिल्हास्तरीय
लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धेचे आयोजन
 नांदेड दि. 13 :- इयत्ता 8 वी व 9 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धेचे आयोजन 11 सप्टेंबर रोजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नांदेड येथे सकाळी 11 वा. करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी सर्व शासकीय माध्यमिक विद्यालय, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत चालविलेल्या शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल, न.पा., मनपा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, कटक मंडळे व शासकीय आश्रम शाळ इ. माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी पात्र राहतील.
या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी अधिक माहितीसाठी संबंधीत तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून स्पर्धेविषयी माहिती घ्यावी. जिल्हास्तरीय स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी लोकसंख्या शिक्षण विभाग प्रमुख डॉ. प्रविणकुमार पाईकराव अधिव्याख्याता डीआयईसीपीडी नांदेड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...